Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदीत संपन्न

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन श्री संत नामदेव महाराज नगरीत स्थळ एम आय टी महाविद्यालय आळंदी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते
उद्घाटन सोहळा ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ अप्पासाहेब पुजारी संत चोखामेळा महाराज यांचे गाणे अभ्यासक व संशोधक प्रमुख पाहुणे ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज देहूकर संत तुकाराम महाराज यांचे वंशज
ह.भ.प.माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, संत तुकाराम महाराज वंशज प्राचार्या उल्काताई चंदनशिवे ,अध्यक्ष संत चोखामेळा अध्यासन केंद्र निमंत्रक सचिन पाटील, संस्थापक संत चोखामेळा अध्यासन केंद्र कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष ,निमंत्रित सदस्य व इतर पदाधिकारी स्वागताध्यक्ष ह.भ.प.माधव नामदास महाराजसंत नामदेव महाराज यांचे वंशज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष अप्पासाहेब पुजारी यांचे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “तेजोपतीचे अन्न म्हणजे आमरस भाकरी दही हे अमृत आहे. शुभकार्यासाठी दही वापरतात.दहीकाला शक्तीवर्धक तेजोपती आहे चोखामेळा, सोयराबाई, बंका, कर्ममेळा ,निर्मळा हे पंचशील आहे.
भारतदेशात बेचाळीस संत महाराष्ट्रात छत्तिस
यापैकी कविसंत बारा आहेत.कवियत्री सहा आहेत” असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.
नवोदित लेखक कवीनी संशोधन करावे. त्यामुळे संतांची महती समजेल. समाजात जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जावून यांची आर्तता मांडून समाजबांधवांना वैज्ञानिक दृष्टिकोन जपत नवा विचार प्रेरित करावा. संत साहित्य रुजविण्यासाठी लेखन कविता जगण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.
संमेलनाच्या निमित्ताने विविध वैशिष्ट्यपूर्ण विषयावर परिसंवाद सादर करण्यात आले.
परिसंवादाचे अध्यक्षपद प्रा अभय टिळक यांनी भूषविले. त्यामध्ये संत चोखोबांनी केलेले विठ्ठलाचे रूप वर्णन वक्ते सचिन महाराज पवार संत चोखामेळा यांनी विठ्ठलभक्तीचे पटवून दिलेलं महत्त्व, वक्ते डॉ रूपेश कुमार जावळे संत चोखामेळा यांची आर्तता वक्ते प्रा. सचिन पवार अशा प्रकारे परिसंवादात सादर करण्यात आले.
महाराष्ट्रातील कवी कवयित्रींचे कविसंमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते.
कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री प्रा रुपाली अवचरे प्रकाशक, पत्रकार होत्या. प्रमुख पाहुणे फुलचंद नागटिळक, युवराज नळे , शाम नवले ,रानकवी जगदीप वनशिव ,प्रा अलका सकपाळ ,माणदेशी ज्येष्ठ कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे, डॉ मधुकर हुजरे ,बाळ पाटील, शिवाजी गायकवाड संजय धोंगडे, पूजा माळी ,योगिता कोठेकर ,प्रा प्रतिमा काळे होत्या.सूत्रसंचालक प्रा डॉ अरविंद हंगरनेकर, ॲड रमेश उमरगे असे अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते
या कविसंमेलनात प्रामुख्याने चोखामेळा यांच्या जीवन प्रवास उलगडून सांगण्यात आला.
कविसंमेलन अध्यक्षपदी प्रा रूपाली अवचरे यांनी माणदेशी ज्येष्ठ कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या कवितेची भरभरून प्रशंसा केली. डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या कवितेने रसिक कवी कवियत्री यांना गहिवर आवरला नाही. आनंदाच्या वातावरण संतमय झालेले सभागृहात हरिनामाचा जागर संत चोखामेळा साहित्य पुरेपूर ऐकण्यासाठी सुवर्ण संधी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी होती.
साहित्य संमेलन दोन दिवसीय मन प्रफुल्लित करत आळंदी पुणे येथे संपन्न झाले

About kalakridadoot

Check Also

कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInपुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्य चित्र कला अकादमी पुणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!