सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारतात ठरले अव्वल
08 सुवर्ण,02 रौप्य व 01 कास्य पदकांची कमाई
प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 20 व्या राष्ट्रीय ज्युनिअर जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकून भारतात प्रथम येण्याचा मान मिळविला.
मागील अनेक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांक पटकवत आहे.या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, यांच्या सह अनेक राज्याचे संघ सहभागी झाले होते.यात महाराष्ट्र संघातील जालना जिल्ह्यातील नेर जि. प. प्रशालेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे अजिंक्य पद मिळवून दिले.16 वर्षा आतील गटातील खेळाडू समर्थ गोपाळ राऊत याने 30 सेकंद स्पीड रीले मध्ये सुवर्णपदक तर डबल अंडर पिअर्स मध्ये रौप्यपदक मिळविले. यश गोविंद गोरे याने 30 सेकंद स्पीड रीले व 30 सेकंद स्पीड मध्ये सुवर्ण पदके मिळविले. चैतन्य क्षीरसागर याने 30 सेकंद स्पीड रीले मध्ये सुवर्ण पदक तर डबल अंडर पिअर्स मध्ये रौप्य पदक मिळविले. 30 सेकंद स्पीड रीले मध्ये कृष्णा प्रल्हाद तरासे याने सुवर्ण पदक मिळविले. 18 वर्षा आतील गटात विराज प्रदीप काळे याने 30 सेकंद स्पीड व 30 सेकंद डबल अंडर पियर्स मध्ये सुवर्ण पदके मिळविले. तर संतोष रामेश्वर कोल्हापुरे याने 30 सेकंद स्पीड मध्ये कास्यपदक व 30 सेकंद डबल अंडर पियर्स मध्ये सुवर्ण पदक मिळविले. महाराष्ट्र संघात नाशिक, नंदुरबार, पालघर, बुलढाणा, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील खेळाडूंची निवड झाली होती. या खेळाडूंना महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक उमेश खंदारकर, जालना यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रदीप राठोड, नाशिक यांनी काम पहिले. या यशाबद्दल त्यांचे टोकीओ ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, राज्याचे सरकार्यवाह दीपक निकम,नेर येथील माजी जि.प.सदस्य भागवत अंकल उफाड, माजी पं.स.सदस्य विजय राठोड, सरपंच तेजस कुळवंत,जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडाधिकारी संतोष वाबळे,केंद्र प्रमुख बाबुराव पवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती प्रेरणा लोंढे,डॉ. भरत वानखेडे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चांद पीजे यांनी अभिनंदन केले.
