जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 रोजी महाकवी सुब्रमण्यम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भाषेचे सौंदर्य, तिची विविधता, विविधतेतून एकता याचा आनंद घेण्यासाठी भारतीय भाषा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध भाषेतून गीत व कविता सादर केले. प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरैशी होत्या, त्यांनी विविध भाषांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना ती बोलण्यास प्रेरित केले.
अख्तर जहाँ कुरैशी यांनी उर्दू भाषेत भाषांतर केलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील कथा विद्यार्थ्यांनी सादर करून भाषांतर साहित्य वापरण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्षा रिजवाना बेगम, शालेय समिती सदस्य अस्मा बेगम, शिक्षिका शिरीन समीना, अब्दुल वहीद जावेद, रईसा बेग व विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड
Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInपुणेः- (प्रतिनिधी -बाबू डिसोजा कुमठेकर ) पुण्यातील प्रतिष्ठीत साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे …