Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

पांडुरंग डोंगरे यांना ‘मिलेनियर ऑफ फार्मर अवॉर्ड’ नवी दिल्ली येथे प्रदान

जालना/ प्रतिनिधी – भारतीय कृषी अनुसंधान संशोधन संस्था,पुसा, नवी दिल्ली येथे तीन दिवसीय कृषी जागरण अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील कृषी सेमिनार संपन्न झाला, कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे राज्यपाल आचार्यजी देवव्रत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात भारतातील उत्कृष्ट प्रगतशील शेतक-यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्र बदनापूर अंतर्गत शंभर शेतकऱ्यांची नावे पाठविण्यात आली होती.
यात अंबड तालुक्यातील कर्जत येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे यांना फळबाग शेती व योग्य व्यवस्थापन या प्रकारात “मिलेनियर ऑफ फार्मर अवॉर्ड २०२३”हा पुरस्कार देण्यात आला. डोंगरे यांनी ड्रॅगन फ्रुट, मोसंबी, डाळींब,आंबा,सिताफळ या फळबाग शेतीतील योग्य नियोजन व कमी खर्चात अधिक उत्पादन घेतले आहे.तसेच मोसंबी साठी जिल्ह्यास भौगोलिक नोंदणी (जी.आय) नामांकन मिळवुन आणले आहे.जालना जिल्हा फळे व बागायतदार संघातील सदस्यांसह त्यांनी २०१२-१३ पासुन पाठपुरावा चालू होता.
कार्यक्रमास माजी मुख्य न्यायमूर्ती साधाशिवम, भारतीय कृषी अनुसंधान संशोधन संस्थेंचे कुलपती डाॅ. व्यास , आटारी, केव्हीकेसचे डाॅ. सिंग, कृषी जागरण चॅनलचे चेअरमन डोमीनेट, सौ.डोमीनेट, महिंद्रा ट्रॅक्टरचे मुख्य मार्केटिंग प्रमुख डाॅ.कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. तसेच जालना जिल्ह्यातुन कृषी विज्ञान केंद्र खरपुडी अंतर्गत पाणी नियोजसाठी उध्दव खेडेकर यांनाही पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल पांडुरंग डोंगरे व उध्दव खेडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!