मंठा/प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषदेची उपक्रमशील शाळा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविते.गेल्यावर्षीपासून शाळेने ‘आनंदाचं झाड ‘ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कारची सुरुवात केली आहे.यानुसार यावर्षीही शाळेतील लेकरांनी पाच उत्कृष्ट ग्रंथांची निवड केली होती.यामध्ये निता आरसुळे ( सफर जगाची ) यांची निवड झाली.
बबन शिंदे (प्रेरणादायी कथा, कथा संग्रह),सुजित कदम (अरे अरे ढगोबा, कविता संग्रह ) चारुलता जुगल राठी(एक सप्तरंगी पाऊलवाट इंद्रधनुष्य) आणि रेणुका मुजुमदार (Helping makes happy) या ग्रंथांचा समावेश होता.निवड झालेल्या ग्रंथांच्या लेखकांना काल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी ‘ आनंदाचं झाड ‘ उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गजानन आढे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून गावाच्या सरपंच निला विकास आढे, माजी सरपंच माऊली राठोड ,केंद्रप्रमुख शिरीष लोहट, किरण गायकवाड, मुख्याध्यापक डी के कुलकर्णी, मुख्याध्यापक श्याम मचाले, राम अंभुरे, अमोल आढे, विठ्ठल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिव्या आढे व कोमल आढे या विद्यार्थिनीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुधीर दिक्कर, श्याम रुपणर, विठ्ल शेळके, संजय काकडे, गणेश आकलोड, योगेश काळे यांनी सहकार्य केले.