Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ स्नेहमिलन मेळावा सपन्न

घनसावंगी/प्रतिनिधी – तालुक्यातील शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ येथे 2002 च्या 10 वी च्या माजी विद्यार्थांचा आनंदात भेटि गाठी होऊन स्नेह मेळावा सपन्न,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मोरे सर उपस्थित होते, गेट-टुगेदर साठी रामेश्वर तांगड़े , बबलू भैया, परमेश्वर आर्दड यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रचे नियोजन केले, बऱ्याच विद्यार्थांनी आपली मनोगत व्यक्त केली, ऋणानुबंधनाच्या जिथून पडल्या भेटि- गाठी , बावीस वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्र येण्याची संधि उपलब्ध झाली,
या जगात कोणी एवढा श्रीमंत नाही की आपलं बालपण किंवा तारुण्य परत मिळू शकेल फक्त मित्रच वेळोवेळी गत स्मृतीची आठवण करून देऊन आपल्याला चिरतारुण्य ठेवू शकतात असे शाळेतील शिक्षकांनी आम्हास मोलाचेअसे मार्गदर्शन केले.
असाच काही चा सुवर्ण क्षणाचा अनुभव शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी अनुभवला.
हा स्नेह मेळावा म्हणजे ऋणानुबंधनाच्या जिथून पडल्या गाठी असाच होता तब्बल 22 वर्षानंतर इयत्ता दहावीतील वर्गमित्र
सोशलमीडिया च्या माध्यमातून एकत्र आले व स्नेह संमेलनाच उत्कृष्ट नियोजन करुण गेट-टुगेदर चा दिवस ठरवण्यात आला.
बावीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याची ही संजीवनी प्रत्येकाला नवउर्जा देऊन गेली या कार्यक्रमास जांबसमर्थ, विरेगांव तांडा,आसनगांव, कोठाळा,घानेगांव व अन्य ठिकाणी वास्तव्यात असलेले सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या,हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षकवृन्दाचे तसेच माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन राठोड व आभार प्रदर्शन आशिया शेख यांनी केले, मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सीमा तांगड़े,अनिता तांगडे, गजानन तांगड़े ,कैलास धूरट,विष्णु गनकवार ,दिलीप पवार, अंगद राठोड, रमेश धांडे उपस्थित राहुन अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला,

About kalakridadoot

Check Also

जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरूवात

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!