Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मिनी ऑलंम्पीक स्पर्धेकरीता आयोजन समीतीची स्थापना

जालना/प्रतिनीधी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वसी वर्षा निमीत्त जालना जिल्ह्यामध्ये प्रथमच भव्य स्वरूपात जालना जिल्हा मिनी ऑलंम्पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असुन याकरीता जालना जिल्ह्यातील सर्व खेळांच्या एकवीध संघटनांनी एकत्र येवुन किंग्स कॉलेज, गांधी चमन, जुना जालना येथे एका बैठकीत जालना जिल्हा मिनी ऑलंम्पीक स्पर्धा 2022 – 23 आयोजन समीतीची स्थापना करण्यात आलेली आहे.
समीतीच्या अध्यक्षपदी सर्व संमतीने फुटबॉल असोसिएशनचे फेरोज अली यांची तर जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे शेख चाँद पी.जे. यांची सचिव पदी व तलवारबाजी असोसिएशनचे विजय गाढेकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष पदी अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशनचे प्रमोद खरात यांची व स्वागताध्यक्षपदी व्हॉलीबाल असोसिएशनचे अर्शद काजी यांची निवड करण्यात आली. सदर कार्यकारणीवर उपाध्यक्ष पदी कबड्डी असोसिएशनचे बि.जे. पाटोळे, खोखो असोसिएशनचे प्रा.डॉ. शेख रफीक, बॅडमिंटन असोसिएशनचे नागोजी चिलकरवार, रोप स्किपींग असोसिएशनचे उमेशचंद्र खंदारकर सहसचीव पदी तायक्वांडो असोसिएशनचे सचिन आर्य, बेसबॉल असोसिएशनचे सोपान शिंदे, टेनीस क्रिकेट असोसिएशनचे संतोष आढे, कराटे असोसिएशनचे शेख नसीर सहकोषाध्यक्ष पदी स्क्वॅश असोसिएशनचे नरेंद्र मुंढे, कार्यकारीणी सदस्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या श्रीमती किरण पाटील, जिम्नॅस्टीक असोसिएशनचे मयुर राऊत, बॉक्सींग असोसिएशनचे प्रशांत डोली, शिनबुडो असोसिएशनचे अशोक शिंदे, सेपाक टाकरा असोसिएशनचे अमोल काटकर, नेटबॉल असोसिएशनचे संतोष वाघ, फलोअर बॉल असोसिएशनचे गणेश गायके, इंडियाका असोसिएशनचे मंगेश सोरटी, फुटसॉल असोसिएशनेच मोईस अंसारी यांची निवड करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या सर्व मान्यताप्राप्त एकवीध असोसिएशनचे सचिव सदर कार्यकारणीचे पदसिद्ध सभासद असतील.
लवकरच जालना जिल्ह्यातील सर्व असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव शारिरीक शिक्षण व खेळातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ईतर समीत्या, खेळ प्रकार, दिनांक घोषीत करण्यात येईल अशी माहिती समीतीचे अध्यक्ष फेरोज अली, सचिव शेख चाँद पी.जे. यांनी दिली आहे.
यावेळी मुश्ताक सिद्दीकी, सुभाष पारे, तुषार गर्जे, मयुर पिवळ यांच्यासह एकवीध संघटनांच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

About kalakridadoot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!