चित्रपटसृष्टीत निर्माता -निर्देशक-लेखक-गीतकार म्हणून जगविख्यात असलेल्या श्री. प्रकाश मेहरा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनोर या गावी दिनांक १३ जुलाई, १९३९ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण फक्त ५ वी पर्यंत झालेले होते. वयाच्या ५ व्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. १९५० मध्ये घरी भांडण झाल्याने रागाच्या भरात खिशात १३ रुपये भांडवल घेऊन मुंबई गाठली. चित्रपट सृष्टीत कोणताही वारसा, वशिला नसतांना केवळ दीर्घ महत्वकांक्षा मनात ठेवून उपाशी पोटी राहून रेल्वे स्टेशन फुटपाथवर आश्रय घेत जीवनाचा प्रवास सुरूच ठेवला. त्यांचा संघर्षाला यश मिळून त्यांना प्रथम “निर्मिती नियंत्रक” म्हणून कामगिरी मिळाली. पुढे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रगती झाली. १९६८ मध्ये त्यांना प्रथमच “हसीना मान जायेगी” या चित्रपटात दिग्दर्शक बनण्याचा मान मिळाला. चित्रपट हाऊसफुल झाल्याने प्रकाश मेहरा हे प्रसिद्ध झाले. यानंतर मेहरांनी मागे वळून न पाहता संघर्ष सुरूच ठेवत आपली विजयी घोडदौड धुमधडाक्यात सुरु ठेवली. १९७१ मध्ये “मेला या रौप्य महोत्सवी हिट चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले. “सलीम – जावेद” या गोड जोडीने लेखन कथांवर आधारित “जंजीर” या चित्रपटाच्या निर्मिती करतांना अनेक अडचणी आल्या. नियोजित नायक देव आनंद, धर्मेंद्र, राजकुमार यांनी चित्रपट नायकाच्या तोंडी एकही गीत नसल्याने ह्या त्रिकुटांनी चक्क नकार दिला. प्राण यांच्या निर्देशानुसार त्यावेळी सुपर फ्लॉप असलेल्या अमिताभ बच्चन यांना ऐनवेळी नायकाचा रोल मिळाला. प्रकाश मेहरांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळेच हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. पुढे विनोद खन्ना सहित अमिताभ बच्चन नायक असलेल्या खून पसीना, हेराफेरी, जादूगर, मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, शराबी इत्यादी चित्रपटांनी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडले.
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शशीकपूर-स्मितापाटील यांना घेऊन “घुंगरू”, शत्रुघ्न सिन्हा सोबत ज्वालामुखी, संजयदत्त सोबत इमानदार सहित बालब्रह्मचारी, मुझे मेरी बीबी से बचाओ, हाथ कि सफाई, हिमालय से ऊंचा, जिंदगी एक जुआ, दलाल इत्यादी चित्रपटांचे निर्मिती व दिग्दर्शन केले.
संगीतकार कल्याणजी- आनंदजी, बप्पी लहिरी गीतकार गुलशन बावरा, अंजण गायक, महेंद्र कपूर, मन्नाडे, किशोर कुमार ह्यांच्या सहवासातच त्यांनी सर्व चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या गीतलेखनात अत्यंत गोडी असल्याने त्यांनी लिहलेले हसीना मान जायेगी (शीर्षक गीत), मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील सलामे इष्क हा मुजरा, लावारीस मधील अपनी तो जैसे तैसे, नमक हलाल मधील पग घुंगरू बांध मीरा नाची थी, इमानदार मधील और इस दिल में क्या रखा है, शराबी मधील मंजिले अपनी जगह है हि गझल अत्यंत श्रवणीय ठरल्या.
२००६ मध्ये त्यांना “ऑल इंडिया मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष पद बहाल झाले.
समाजातील रंजल्या गांजल्या निराधार दुनियाने थट्टा उडविलेल्या उपेक्षित वर्गाच्या भावनांना केंद्र बिंदू मानून त्यांना जीवन जगण्याचा उपदेश आपल्या चित्रपटातून सदैव देणाऱ्या या महान निर्माता-निर्देशांकाचे १७ मे २००९ रोजी या इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांचा निर्देशित चित्रपटाद्वारे ते आज देखील आम्हाला संदेश देत आहेत.
“जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकरायेगी”
“मौत महेबुबा है अपने साथ लेकर जाएगी”
“मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलाएगा
वो मुकद्दर का सिकंदर जानेमन केहलाएगा”
संकल्पना
श्री. चंद्रकांत धोंडीराज कुलकर्णी
(अध्यक्ष :- मराठवाडा ऑटो रिक्षा युनियन)
संपर्क क्रमांक :- ९३२५८२६७४१