Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी अंबाजोगाई येथे स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली

बीड, दि.11 (जि. मा. का.) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड अंतर्गत अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र, अंबाजोगाई च्या 12 व्या वार्षिक सभे निमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने दि 08 ऑगस्ट 2022 रोजी अंबाजोगाई येथे “हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली ची सुरुवात तहसीलदार विपीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी एस बी चिंचोलीकर उपस्थित होते. स्वयंसहाय्यता महिला बचतगट तिरंगा रॅली तहसील कार्यालय ते अनिकेत मंगल कार्यालया पर्यन्त घेण्यात आली होती.

त्यानंतर अनिकेत मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या महिलांच्या उपस्थिती मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ” तिरंगा वितरण स्टॉलचे उदघाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वयंसहाय्य महिला बचतगट मेळाव्यामध्ये बचतगटांना 75 लाखांचे बँक कर्जाचे धनादेश देण्यात आले. त्याचप्रमाणे मुलीच्या जन्माचे स्वागत उपक्रमामध्ये 3 माता व त्यांच्या कन्यारत्ना चे स्वागत करण्यात आले. तसेंच नाबार्ड योजना, खादी ग्रामोद्योग योजना, हिंदुस्थान कॅटल फिड्स व दुग्धव्यवसाय, नवतेजस्विनी योजना,इत्यादी ची माहिती महिलांना देण्यात आली. त्याचप्रमाणे उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट नेतृत्व व उत्कृष्ट स्टाफ व उत्कृष्ट टीमवर्क चा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नाबार्ड चे जिल्हा विकास अधिकारी श्री तात्याराव मार्कड, जिल्हा खादी ग्रामोद्योग चे व्यवस्थापक सतीश खरात, माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री एस बी चिंचोलीकर, ICICI बँक फिल्ड ऑफिसर श्रीनिवास नरवडे, माविम लेखाधिकारी सी आर मुंजेवार, हिंदुस्थान कॅटल फिड्स चे डॉ बरुरे,अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र च्या अध्यक्ष रेखाताई वेडे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी CMRC च्या सर्व पदाधिकारी/कार्यकारिणी, CMRC व्यवस्थापक मीनाताई कांबळे, क्षेत्रीय समन्वयक खंडू डोने, पंकज जोगदंड, उपजीविका समन्वयक अनिता जोगदंड, सहयोगिनी अनुराधा वाघ, राधा काशीद, विशाखा घाडगे, सुचिता सरवदे, ज्योती वाघळकर, आणि बचतगटाच्या महिलांनी यशस्वी प्रयत्न केले.
00000

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!