Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 

सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उदघाटन, दि. 12 ऑगस्टपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन

जालना दि. 10 (जिमाका) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. विदयार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी मोठया संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्यावतीने सेंट मेरी स्कुल येथे दि. 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मनुज जिंदल, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, सेंट मेरी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य फादर मनोज, शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय व महाविदयालयीन विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत, समूह नृत्य, समूहगान, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी अवश्य सहभागी व्हावे. स्वातंत्र्यांसाठी ज्यांनी ज्यांनी बलीदान दिले आहे, त्यांचे स्मरण करुन त्या सर्वांचा सन्मान यामाध्यमातून जपला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा अवश्य फडकवावा.

मुख्य कार्यकारी मनुज जिंदल म्हणाले की, मागील 75 वर्षांत आपल्या देशाने वेगाने प्रगती केली आहे. या पुढील 75 वर्षांमध्येही प्रगतीचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विदयार्थ्यांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे. प्रगती करत असताना एकमेकांप्रती आदरची भावना ठेवावी. आपला देश विविध संस्कृती, भाषेने नटलेला आहे. या प्रतीही परस्परांमध्ये आदर ठेवावा. जेणेकरुन खऱ्या अर्थाने आपण प्रगती साधल्याचे समाधान मिळेल. यावेळी श्री. साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीमती धुपे यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान समूह राष्ट्रगान, शालेय विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय गीतगायन, नृत्य, एकपात्री अभिनय, समूहगान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय ‘ अ’- गट इयत्ता १ ते ५ , ब- गट इयत्ता ६ ते ८ तर क -गट इतत्ता ९ ते १२ या गटात वैयक्तिक आणि समूह प्रकारात स्पर्धा होतील.

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा बुधवारी ( ता.१०) पार पडल्या. गुरुवारी ( ता.११ ) एकल व समूहनृत्य स्पर्धा होतील. शुक्रवारी ( ता.१२) एकपात्री अभिनय, एकल व समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी पहिले,दुसरे आणि तृतीय पारितोषिक,स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र असे स्वरूप आहे.

***

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!