जालना (प्रतिनिधी) ः बदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील नवसाला पावणारे श्री रोकडोबा महाराज यांच्या यात्रेसाठी बाहेर राज्यातून दर्शनासाठी अनेक भाविकभक्त येतात. मागील दोन वर्षामध्ये कोरोनाचे संकट आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीमुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. मात्र शासनाने सर्व नियम हटविल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात रोकडोबा महाराज यांची यात्र भरणार असून या यात्रेमध्ये पंचक्रोषीतील भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
या यात्रेमध्ये आज दि. 04 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता रोकोबा महाराज यांच्या मंदिरापासून भव्यदिव्य दिंडी निघून ही दिंडी महादेव मंदिर, मारोती मंदिर, रोकोबा महाराज यांच्या मंदिरासमोर सदर दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे. तसेच 11 वाजता भागवत कथेची समाप्ती होते. दुपारी 12 वाजता ब्राह्मण पुरोहितचे नैवेद्य व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन आणि 4 वाजता ब्राह्मण गल्ली ते रोकडोबा महाराज मंदिरापर्यंत भाविक नवस फेडण्यासाठी निघतात व प्रा. राम भाले यांच्याहस्ते रोकडोबा महाराज यांना वस्त्र घालून महापुजा केली जाते. हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर ब्राह्मणांना हार व शाल देवून सत्कार करण्यात येतो. यामध्ये वंसत मुळे, प्रदिप मुळे, सुरेश मुळे, राहुल मुळे, डिगाबर मुळे, आशोक पाटणकर, लक्ष्मण जोशी, दिलीप मुळे, रामप्रसाद मुळे, भगवान मुळे, संतोष मुळे, कैलास मुळे, गणेश मुळे, सतिष मुळे आदींच्या यावेळी सत्कार केला जातो. त्यानंतर रात्री 8 ते 10 नाटकाचा कार्यक्रम. सकाळी 5 वाजता आई भवाणीचे सोंग निघते. या यात्रेसाठी भविकभक्तांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन उज्जैनपुरी ग्रामस्थांनी केले आहे.
या यात्रेसाठी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. सतोष सांबरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव आंबेकर, युवा सेना प्रमुख भाऊसाहेब घुगे, भानुदास घुगे, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, नाभिक महासंघाचे कल्याण दळे यांच्यासह भविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
