Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी जाहिर

अध्यक्षपदी शंकर सातपुते तर कार्याध्यक्षपदी पांडूरंग शिंदे
जालना (प्रतिनिधी) ः क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी दि. 26 मार्च शुक्रवार रोजी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर सातपुते तर कार्याध्यक्षपदी पांडूरंग शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला संतोष जमधडे, आश्‍विन आंबेकर, महेंद्र रत्नपारखे, राजु पवार, राजेंद्र जाधव, हरीष रत्नपारखे, अनिल वाघमारे, ॲड. दैने, नन्नभाऊ कांबळे, ताहेर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समितीची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. उपाध्यक्षपदी वैभव वानखेडे, सचिव निखील पाऊलबुद्धे, कोषाध्यक्ष शिव पखाले, सहसचिव स्पप्नील श्रीसुंदर, स्वागताध्यक्ष नितीन इंगळे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी दशरथ तोंडूळे, राम देवकर, प्रकाश इंगळे, मंगलताई खांडेभराड, मंजुषा घायाळ, अंकुश गायकवाड, निलेश वानखेडे, विष्णू घायाळ, योगेश खरात, राम गिराम, एकनाथ घोलप, शिवकुमार राऊत, आमोल राऊत, दादाराव डांगे, करण खांडेभराड, राजेश तोंडूळे, संचिन गाढेकर, अजय चापलवार, अब्दुल मोही, आरेफ खान, अनिकेत मुळे, शुभम खंदारे, राहुल पहाडे, अनिकेत तुपे, प्रविण भिंगारे, आकाश वैद्य, विजय साखरे आदींनी या नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. सदरील बैठकीचे आयोजन दिपक वैद्य यांनी केले होते. या बैठकीचे सुत्रसंचालन संतोष डोंगरखोस यांनी केले तर आभार बाळासाहेब तिडके यांनी मानले.

About kalakridadoot

Check Also

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!