Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ समारोहास सुरुवात

• शालेय विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठरले लक्षवेधी

• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतीक समारोहाची सुरुवात

परभणी,(जिमाका)दि.11: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ या सांस्कृतीक समारोहाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, जयघोषाने शेकडो हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात सुरुवात झाली.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या या सांस्कृतीक समारोहाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक जयंत मिना, औरंगाबाद येथील राज्य राखीव दलाचे समादेशक निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उपस्थिती होती.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्व नागरीकांना शुभेच्छा दिल्या. अनेक महान स्वातंत्रय् सैनिकांनी आपल्या प्राणांची आहूती दिल्याने आपणांस हे स्वातंत्र्य संघर्षाने मिळालेले आहे. आपणांस मिळालेले स्वातंत्र्य अमूल्य असे आहे. त्या स्वातंत्र्याचा मान-सन्मान ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तसेच ‘हर घर तिरंगा’ या अभियांनातंर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज संहितेचे पालन करुन तिरंगा फडकवावा असे आवाहन केले.
या सांस्कृतीक कार्यक्रमाची सुरुवात पोलिस बॅन्डच्या पथकाने सादर केलेल्या राष्ट्रभक्तीपर गीताने करण्यात आली. यानंतर येथील मराठवाडा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीताद्वारे विविध राज्यातील विविध संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडविले. तर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादरीकरण केलेले हरियाणवी गाणे लक्षवेधी ठरले. कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनींनी भारत की दिप्ती शलाकाएं, पुछ रहा अस्तित्व तुमहारा हा कार्यक्रम सादर केला. कत्रुवार कर्णबधीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मां तुझे सलाम’ या गीतावर सादरीकरण केले. मराठवाडा हायस्कुलची विद्यार्थ्यींनी सई चिटणीस हिने ‘मी माता’ हे एकपात्री नाटक यावेळी सादर केले. तर बाल विद्या मंदिर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो हे समूहगीत सादर केले. यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महापुरषांची वेशभूषा साकारुन आपल्या कला सादर केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत डोलाने फडकणारे तिरंगी झेंडे, व्यासपीठासह इमारतीवरील सुंदर अशी आकर्षक रोषणाई, सनई-चौघड्यांच्या सुमधूर सुरु, ‘हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंट च्या आयोजनाने अमृत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अधिक आकर्षक ठरला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल तुरुकमाने, मधुकर उमरीकर, सुभाष ढगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजक तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आभार मानले.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतीक समारोहाचा आनंद घेतला.

****

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!