Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

खरंच स्त्री स्वतंत्र आहे का?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त केलेला हा उहापोह!
– संपादक
सौ.सुलोचना बी.देशमुख,
अध्यक्षा,जिजाऊ सक्षम फाउंडेशन
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने ॠजागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य… अशा या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा… आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणार्‍या राजमाता जिजाऊ, मैन मेरी झांसी नही दुंगी , असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणार्‍या राणी लक्ष्मीबाई, आणि स्त्री शिक्षणाची दारे खुली करून देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महान स्त्रियांना मानाचा मुजरा… तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व तेसारे वसावे…. हा सर्वत्र जगभर महिला दिन साजरा होत आहे सर्व महिला आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत. आज भारतातील प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री प्रगतिपथावर आहे आपल्या भारत देशांमधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील भारतीय पोलिस सेवेत अधिकारपदी असलेल्या किरण बेदी भारतरत्न किताबाच्या मानकरी गानसम्राज्ञी लता मंगेशकर. एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे सलाम या नारी शक्तीला…. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत आपल्या इतिहासात हिरकणी सारखी एक आई होऊन गेली जी स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा कडा उतरून आली. झाशीची राणी होऊन गेली बाळ पाठीवर बांधून लढली, त्यावरुन स्त्री एक आघात शक्तीचे रूप आहे हे समजते…. आज इथे सर्व स्त्रिया आनंदित आहे, पण खरंच स्त्री स्वतंत्र झाली आहे का? हा प्रश्न समाजाला विचारण्याची वेळ आली आहे. आज ही स्त्री समाजात असुरक्षित आहे आजही मुलींना जन्म देताना विचार केला जातो. मुलींचा तिरस्कार केला जातो. महिलांचा अपमान केला जातो. पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्री ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपविण्याएवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी , तरच आपला भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल…जय जिजाऊ!

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!