Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मुलांच्या आयुष्यात मॉ साहेब जिजाऊं सारखी संस्काराची गुंतवणूक करा-प्रा.अक्षय चिखले

जालना : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना मॉ साहेब जिजाऊंनी समता, ममता आणि स्वाभिमान रुपी संस्कार व सुविचारवादी,मानवतावादी, विवेकवादी विचारांनी घडवले तसेच संस्कार आजच्या पिढीवर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा. अक्षय चिखले यांनी येथे बोलतांना केले.
जालना शहरापासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सरपंच विष्णु  घनघाव व शिवबा मित्रमंडळ, शिवप्रेमींच्यावतीने प्रा. चिखले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.अक्षय चिखले म्हणाले की
शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडत आहेत परंतु त्यांच्यातील अनेकांमध्ये व्यवहारिक शिक्षणाचा अभाव जाणवताना दिसतो हाही चिंतेचा विषय आहे, असे सांगून प्रा. चिखले म्हणाले की तुकाराम महाराज म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा| त्याचा तिन्ही लोकीं झेंडा| आपल्या मुलांच्या सद्गुणांचा झेंडा तिन्ही लोकीं नाही लागला तरी चालेल परंतु गावात, तालुक्यात आपल्या परिसरात तरी लागलाच पाहिजे असेही प्रा. चिखले म्हणाले. व्याख्यानाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन गणेश महाराज शिनगारे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार विजय घनघाव यांनी मानले. कार्यक्रमाला उध्दव महाराज घनघाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षकसेलचे जिल्हा उपाध्यक्ष ओम एखंडे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!