जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीतर्फे दि. 13 नोव्हेंबर शनिवार रोजी जालना शहरात दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली. शहरातील मशिन हॉस्पीटल समोर असलेल्या मधुर बंकट हॉलमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी विशेष उपस्थिती राहणार असून प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, प्रदेश सरचिटणीस आ. राजेश राठोड, परतुरचे मा. आ. सुरेशकुमार जेथलिया, जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास कॉग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर तसेच विविध आघाड्यांचे आजीमाजी पदाधिकारी, पक्षाचे आजीमाजी जि.प., पं.स., न. प. चे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, विजय चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, न.प. गटनेते गणेश राऊत, यांनी केले आहे.
Check Also
“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न
Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInवानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन …