Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी – सचिव अपूर्व चंद्रा ‘घरोघरी तिरंगा’अभियानासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रसिध्दी साहित्याचे कौतुक

नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायलाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफीती, जिंगल्स ,बॅनर आदि प्रचार साहित्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी कौतुक केले आहे.

शास्त्रीभवन स्थित माहिती व प्रसारण मंत्रालयात आज श्री. चंद्रा यांनी राज्यशासनाच्या ‘घरोघरी तिरंगा अभियाना’त जनतेने मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तसेच या अभियानास शुभेच्छा देणारा संदेश महाराष्ट्र परिचय केंद्रास दिला यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय ‘हर घर तिरंगा अभियान’ देशभर राबवित आहेत. महाराष्ट्रातही हे अभियान राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ नावाने राबविण्यात येत आहे.

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा प्रचार व जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने www.mahaamrut.org हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावर जिंगल्स, कलाकारांद्वारे आवाहन करणारे संदेश, ध्वनिचित्रफीती ,विशेष गाणी, बॅनर आदि साहित्य उपलब्ध करू देण्यात आले आहे. राज्य शासनाचे विविध विभाग व जनसामान्य या संकेतस्थळाहून उपलब्ध साहित्य सहज डाऊनलोड करून वापरू शकतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली ही सोय अभिनव असून यामुळे राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियाना’विषयी जनजागृती निर्माण होण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे श्री चंद्रा यांनी यावेळी सांगितले.यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी,महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योकौर अरोरा आणि कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

About kalakridadoot

Check Also

पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInनांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!