जालना/प्रतिनीधी – टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व लातुर जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान उदगीर येथे होणार्या 22 व्या ज्युनीयर (19 वर्षाआतील)राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशनच्या वतीने दिनांक 27 ऑगस्ट 2022 शनीवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सकाळी 10 वाजल्यापासुन निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. निवड चाचणीमधुन 14 मुले व 14 मुलींची निवड करण्यात येणार आहे.
निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता केाणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसुन खेळाडुचे वय 19 वर्षाच्या आत व जन्मतारीख 30/09/2003 च्या नंतरची असणे आवश्यक आहे. अधिक माहीतीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं.9822456366 किंवा जयकुमार वाहुळे, मंगेश सोरटी, नितीन जाधव, संतोष वाघ, श्रीमती किरण पाटील, वेदांत सोरटी, शेख समीर, सोहेल खान, पवन दांडगे, शैलेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा.
तरी निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमजत पठाण, देवगिरी विद्या प्रतिष्ठाण, जालनाचे अध्यक्ष बबन दादा सोरटी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
