जालना/ प्रतिनिधी – जिल्हा बुद्धिबळ संघाच्या वतीने पुणे येथे दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या ११ वर्षाखालील तसेच दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान पालघर येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, भक्त नगर,रेवगाव रोड, जालना येथे करण्यात आले आहे.
वरील ११ वर्ष वयोगटातील पहिले २ मुले व २ मुलींची तसेच १९ वर्ष वयोगटातील पहिले ४ मुले व ४ मुली गुणानुक्रमे निवड करण्यात येईल.
या स्पर्धेत विजयी खेळाडू हे पुढील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी स्वतःचा बुद्धिबळपट व नगर परिषदेचा जन्माचा दाखला सोबत आणावा.
या निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त बुद्धिबळपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, सचिव प्रा डॉ रत्नाकर कुलकर्णी, श्री सतीश ठाकूर, श्री कृष्णा ठाकूर, प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा गजानन जगताप यांनी केले.