Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालन्याच्या झोपडपट्टीतल्या फिल्ममेकर्स ची चित्रपट क्षेत्रात “UK” भरारी

जालना/प्रतिनिधी – जालना येथील रहिवाशी दिग्दर्शक अभिजित दगडूजी चव्हाण यांनी लिखाण व दिग्दर्शित केलेल्या दान पात्र या लघुपटाची थेट UK मध्ये होणाऱ्या “लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क”सेशन २०२३ या उच्च व सन्माननीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेली आहे.
आजपर्यंत देशभरात झालेल्या अनेक मोठ मोठ्या सन्माननीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झालेली आहे.पंजाब,केरळ, हैदराबाद, महाराष्ट्र या राज्यांतील अनेक मोठ्या महोत्सवांमध्ये या लघुपटाने पारितोषिके पटकावली आहेत.
या यशासाठी त्यांचे सर्वच क्षेत्रांतून भरभरून कौतुक करण्यात येत आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फिल्म मेकिंग शिकून, अतिशय कठोर मेहनती च्या जोरावर, कुठलाही आर्थिक पाठींबा नसताना अहो रात्र मेहनत घेऊन, छोटीशी क्राउड फंडिंग करून, एक उत्तम दर्जाची कलाकृती स्लम फिल्म या टीमने बनवली आहे.आणि त्याचे फलित म्हणून आज थेट UK च्या आंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ने या सिनेमाची दखल घेत निवड केली आहे.

ही सर्वच भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

शहरातील उद्योगपतींनी,व्यावसायिकांनी चित्रपट क्षेत्राकडे एक सकारात्मक दृष्टीने पहावे व सर्वच फिल्म मेकर्स ना सिनेमा बनवण्यास आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन,दिग्दर्शक अभिजित चव्हाण यांनी केले आहे.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!