भंडारा/प्रतिनिधी- 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 ला दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप TENNI KOIT चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, भंडारा येथील वैनगंगा स्पोर्टिंग चे खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची, चेन्नई येथे झालेल्या इंडिया टीम सिलेक्शन कॅम्प मधून निवड झाली आहे. हे दोघे ही महाराष्ट्र संघाचे स्टार खेळाडू आहेत. त्यांनी अनेक वर्षापासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राला बरीच पदके प्राप्त करून दिली आहेत. त्यांना महाराष्ट्र टेनीकवाइट असोसिएशन चे माजी अध्यक्ष एडवोकेट मधुकांत बांडेबुचे, राष्ट्रीय पंच अरुण बांडेबुचे व राष्ट्रीय रेफ्रि बोर्ड मेंबर तथा महाराष्ट्र असोसिएशन कोषाध्यक्ष एडवोकेट मृणाल बांडेबुचे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षण व सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्रअसोसिएशनचे सचिव तथा राष्ट्रीय संघ निवड समिती सदस्य अनिल वरपे पुणे यांनी देखील खेळाडूंच्या निवडीसाठी विशेष परिश्रम घेतले.
भंडारा डिस्ट्रिक्ट जअसोसिएशन व वैनगंगा स्पोर्टिंग भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
