Breaking News

राष्ट्रीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक – जेईएसच्या कु. तेजल साळवेचा संघात समावेश

जालना/प्रतिनीधी – गोवा येथे संपन्न झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे. यात विशेष म्हणजे जे. ई. एस. महाविद्यालयाची खेळाडू कु. तेजल साळवे इ. 12 वी विज्ञान हीचा महाराष्ट्राच्या संघात सहभाग असुन हीने पूर्वशा शेंडगे सोबत सातत्य राखून पदक प्राप्त करून घवघवित यश …

Read More »

राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

सोलापूर/प्रतिनिधी – राज्य फुटबॉल टेनिस असोसिएशन तसेच ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशन व सोलापूर शहर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन …

Read More »

राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धे निमित्त महाराष्ट्रभरातून रॅली संपन्न

प्रतिनिधी – महाराष्ट्र एमेच्योर नेटबॉल असोसिएशनच्या वतीने दिनांक 1 ते 4 मार्च दरम्यान नागपूर येथे 40 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेनिमित्त महाराष्ट्राततील जवळपास 20 जिल्ह्यातून एकाच वेळी रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात नागपूर येथून झूम व्हिडिओ वरून राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन भाई कामदार यांच्या …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका

मुंबई, दि. २७ : सुपरस्टार रेडर पुजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात यजमान गुजरातला धुळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ४६-२२ ने दणदणीत सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम खेळीतून गुजरातवर चार …

Read More »

पालघरच्या सना गोंसोलविस यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक

पालघर दि. 27 : चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत पालघरच्या युवा बॉक्सिंग पट्टू सना गोंसोलविस यांना अजिंक्य स्पर्धेत 70 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले आहे. . यास्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला उपविजेते पदावरती समाधान मानावे लागलेआहे. तर महाराष्ट्राची बॉक्सिंग मध्ये कामगिरी सुधारत असताना पालघर जिल्ह्याच्याही कामगिरीमध्ये सुधारणा होत …

Read More »

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा

औरंगाबाद दि.31, (विमाका) :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी …

Read More »

खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.२ : खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा. असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्यावतीने हांडेवाडी रोड, महम्मदवाडी येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल …

Read More »

ज्ञानेश्वरी शिंदे तलवारबाजीत गाजवणार आंतरराष्ट्रीय मैदान; जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सी. एस.आर. फंडाने दिला मदतीचा हात

लातूर दि.6 ( जिमाका ) शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची ज्ञानेश्वरी माधव शिंदे हिची तलवारबाजीत इंग्लड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सी एस आर मधून एक लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,उपसंचालक श्री.सुधीर मोरे यांच्या सकारात्मकतेतून व …

Read More »

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. हॉटेल ट्रायडंट येथे …

Read More »

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि. १४: महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरणदेखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे आयोजित ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे …

Read More »
error: Content is protected !!